सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

आपले मानबिंदु

परवा सहज युट्युबवरुन गाणी शोधत होतो.तेव्हा या वर्षातील उत्तम हिन्दी गाणी अशा ओळीवर क्लिक केले तर एक गाणे सुरु झाले.ओरीजनल मेलडी म्युजीक प्रस्तुत सुरींदर सिंघ यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत आहे.त्या गीतातील सुर,शब्द वा संगीत याहुन त्यानंतर मधेच येणारे माहितीफलक आश्चर्यजनक व सुखद धक्का देणारे वाटले.त्या फलकांमधुन मिळालेली माहिती संपादित करुनच हे लेखन करीत आहे.
विशेषतः भ्रष्टाचाराच्या मालिकांचा माध्यमांद्वारे जनमानसावर होत असतांना जी सार्वत्रिक निराशा आली आहे त्यात आपले महत्वाचे मानबिंदु नजरेआड होऊ नयेत हेहि विसरता येणार नाही.या ध्वनीचित्रफीतीत शोधलेल्या या अभिमानास्पद गोष्टी सादर करीत आहे.
(१)जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र.(आपल्या लोकशाहीमुळेच आपल्याला सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे)
(२)जगातील सर्वात मोठे लष्कर असलेला देश.वेगवेगळ्या युद्धांमध्ये विजयप्राप्तीची सर्वाधिक टक्केवारी (८३%) आपल्या जवानांनी गाठली आहे.
(३)तथापि गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासात आपण कधीही परकीय देशावर अतिक्रमण केलेले नाही.
(४) जगातील सर्वात मोठी पोलिस यंत्रणा भारतात आहे.
(५) जगात सर्वाधिक लांबीचा लोहमार्ग आपल्या देशात आहे.
(६) जगातील एकचतुर्थांश लोक ज्या धर्मांचे अनुयायी आहेत अशा चार धर्मांची स्थापना भारतात झालेली आहे.(हिन्दु,जैन,शीख आणि बौद्ध)
(७) इंग्लिश बोलणारे जगातील सर्वाधिक लोक भारतात आहेत.
(८) अभियंते आणि शास्त्रद्न्य यांचा जगातील दुसरा क्रमांकाचा ताफा भारताजवळ आहे.
(९) अमेरिकेतील नासा या संस्थेतील दर दहापैकी चार शास्त्रद्न्य भारतीय आहेत.
(१०) आपली ब्यांडविथ कपासिटी ८.५ टेराबाइट असुन ती जगात सर्वाधिक आहे.
(११) भारतातुन नव्वद देशांना सोफ़्ट्वेअरची निर्यात होते.
(१२) स्वदेशात सुपर काम्पुटर बनविणारा तिसरा देश भारत आहे.
(१३) गुंतवणुकीत जगात तिसरा क्रमांक असणारा देश.
(१४) स्टाक एक्स्चेंज मध्ये नोंद असलेल्या कंपन्यांची संख्या पाहिली तर भारत जगात दुसरा देश ठरतो.
(१५) मोटर बाइक तयार करणारे देश पाहिले तर भारताचा क्रमांक जगात दूसरा आहे.
(१६) हिरे प्रक्रीया व निर्यात करणारा भारत हा जगातील अग्रगण्य देश ठरतो कारण जगातील दहापैकी नऊ हिरे भारतातुन जातात.
भारतीयांना अभिमान वाटावा अशा काही कर्तबगार व्यक्ती :जगातील सर्वोत्तम फलंदाजी करणारा क्रिकेट्वीर, हाट्मेलचा निर्माता,विंडोज २००० चा टेस्टींग डायरेक्टर,सन मायक्रोसिस्टीमचा सह निर्माता आणि असेच अनेक.........
. मेरा भरत महान.

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

रेल्वेच्या नकाशात खानदेश दिसणार का ?

देशाचा किंवा राज्याचा विकास हा त्या भागातील लोहमार्ग आणि वाहतुकीची साधने यवरच मोजला जातो.म्हणुनच कोकण आणि मराठवाडा यांच्या विकासाकरीता जी आंदोलने झाली त्यावेळी  रेल्वे हाच प्रमुख कार्यक्रम होता हा इतिहास आहे.मराठवाडयात पुर्ण रुंदीचे लोहमार्ग झले म्हणुनच तेथला सामान्य माणुस कमीत कमी खर्चात सरळ मुंबई ,पुणे किंवा बंगलोर येथे काही तासात आरामात जाऊ शकतो.इतकेच नाही तर अमरावती,औरंगाबाद नांदेड अशा ठिकाणांवरुन मुंबईपर्यंत जलद व अतिजलद गाड्याही राजधानीला जोडल्या गेल्या आहेत.
              अशा परिस्थितीत  खानदेशचा सर्वसामान्य माणुस त्याला परवडेल अशा रेल्वे  प्रवासापासुन वर्षानुवर्षे  वंचित राहिला आहे.त्यासाठी रेल्वे  प्रशासनाशी सल्ला मसलत करुन  काही मागण्या राजकिय बळानिशी दिल्ली दरबारात नेणे गरजेचे आहे.भुसावळ हे रेल्वेचे मोठे तांत्रिक महत्वाचे जंक्शन असुनही तेथुन सु्टणारी मध्य रेल्वेची मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांपर्यंत एकही गाडी नाही हे दुर्दैव.
              धुळे - दादर एक्सप्रेस टाइम टेबलमध्ये आहे पण तो छापाचाच गणपती आहे.काही डबे पसेंजरला संध्याकाळी जोडले जातात व नंतर ते पठाणकोट एक्सप्रेसला जोडुन नव्या नावाने ही गाडी भल्या पहाटे अडीचला कल्याण व चार वाजता दादरला जाते.इतकी गैर सोयीची गाडी रेल्वे वेळापत्रकात शोधुनही सापडणार नाही.
             जळगाव भुसावळ मोठ्या मार्गावरची मोठी स्थानके असली तरी तेथुन सुट्णारी एकही गाडी नसल्याने उत्तर भारतीय बांधवांच्या सौजन्यावरच त्यांचा नासिक वा मुम्बई प्रवास अवलंबुन असतो.त्यापैकी अनेक गाड्या जळगाव,मनमाड जंक्शन आणि नासिक येथेही न थांबणार्या नाहीत व अशा द्रुतगती गाड्यांची संख्या वाढतच जाणार आहे.अनेक गाड्यांना चारशे किलोमीटरपर्यंत तिकीट दीले जात नाही.अर्थात हे बंधन मुंबई भुसावळ दरम्यान साठीच प्रामुख्याने आहे.यासाठी भुसावळ आणि धुळे येथुन मुंबई, पुणे,नांदेड,लातुर, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी अशा ठिकाणांपर्यंत येजा करणारी प्यासेंजर, एक्सप्रेस सुरु करने तातडीचे झाले आहे.
           खानदेशला राज्याच्या राजधानीला जोडणारी [नागपुर-मुंबै वा औरंगाबाद-मुंबै सारखी]अतिजलद गाडी हेहि स्वप्न राहु नये. किमान नांदेड व मुंबै दोनही ठिकाणांवरुन सकाळी निघुन संध्याकाळी पोचणारी तपोवन सारखी दिवसाची जनता एक्सप्रेस तरी पदरात पडावी.धुळे आणि भुसावळ येथुन शिर्डी जाणारी प्रवासी गाडी सुरु होणे अशक्य नाही.मराठवाड्यातुन मनमाड्पर्यंत येणारी रेल्वे वाहतुक शिर्डीकडे वळ्वली गेली आहे.भारत भरातुन शिर्डी पर्यंत नव्याने गाड्या सुरु होत असतील तर खानदेश वंचीत राहु नये.
         महाराष्ट्राची शहरे एकमेकांना जोडणारी सेवाही गरजेची आहे, उदहरणार्थ पुणे,कोल्हापुर,नांदेड,नासिक,औरंगबाद,अमरावती,लातुर,रत्नागिरी,डहाणु.आपली रेल्वे सेवा प्रामुख्याने देशातील अन्य भागातील शहरे मुंबै व आता पुणे इथपर्यंत जोडण्यासाठीच सुरु केली जाते.त्यामुळे त्यांचे वेळापत्रक मधल्या प्रवाशांचा सोयीचे नसतेच.त्यामुळे पुण्याला शिकण्यासाठी वा नोकरीसाठी गेलेला तरुण सुटीतही खानदेशातल्या घरी सोयीचा प्रवास करुन येउ शकत नाही.महाराष्ट्र एक्स्प्रेस नावाची एकेकाळी सोयीची वाटणारी गाडी ही पुढील दोन महिने बुक असते.
        धुळे शिरपुर मार्गे इंदुर रेल्वेमार्गाचे स्वप्न उद्या साकार झाले तरी धुळे येथुन सुटणारी गाडीच धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहेव त्यासाठी त्या नव्या रेल्वेमार्गाची वाट पाहण्याची गरज नाही हेहि विसरुन चालणार नाही.महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने खानदेशातील प्रवाशांचा विचार करुन राज्याचे विभाग एकमेकांना जोडणारे रेल्वे गाड्यांचे जाळे निर्माण होइल तो भाग्याचा दिवस ठरेल.
 अविनाश सोनवणे
Related Posts Plugin for WordPress, Blogger...